सिल्लोड, (प्रतिनीधी) : अंभईगावात दगडफेक झाल्याने पुन्हा तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना शांतता ठेवन्याचे आवाहन केले होते. यामुळे गावात आता शांतता आहे. मात्र दगडफेकीच्या घटनेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी बुधवारी दिवसभर आपपली दुकाने १०० टक्के बंद ठेवली होती.
या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अंभई येथे दंगल घडवणाऱ्या २०६ आरोपी पैकी अजिंठा पोलिसांनी मंगळवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन करून १३ लोकांना अटक केली होती. त्या आरोपींना सिल्लोड न्यायालयात बुधवारी दुपारी हजर केले असता सर्व १३ आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली.












